केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

केदार शिंदे

मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) त्यांच्या चित्रपटाची प्रचंड लोकप्रिय ठरतात. नेहमी एक वेगळा विषय घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. असाच एक आगळा वेगळा विषय घेऊन केदार शिंदे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

सोशल मिडीयावर सक्रिय असलले केदार शिंदे यांनी एक ट्विट (Tweet) करत आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे. ‘बाईपण भारी देवा’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाच्या नावामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. आता सोशल मीडिया पोस्टद्वारे केदार शिंदे यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे.

केदार शिंदे यांनी ट्वीट करत ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. “कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर! ‘बाईपण भारी देवा.’ २८ जानेवारी २०२२ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!” असे ट्वीट त्यांनी केले आहे. केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या पोस्टरनंतर या चित्रपटाची चर्चा रंगली असून अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या