केदार शिंदे म्हणतात, मराठी मनोरंजन क्षेत्रात “माल” नाही तर, रसिकांचं “मोल” महत्वाचं

KEDAR SHINDE

मुंबई : सध्या बॉलीवूड मध्ये दूषित वातावरण निर्माण झाले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आता वेगळे वळण आले. सुशांत सिंह प्रकरणामध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्या अनेक बॉलीवूड कलाकारांचे नाव समोर आले. NCB ने या प्रकरणात अमली पदार्थ सेवन कनेक्शन शोधून काढले आणि अनेकांची चौकशी सुरु केली.

याचदरम्यान अमली पदार्थ सेवन प्रकरणामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत या अभिनेत्रींची नावे समोर आले या नंतर या तीनही अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली. एक वर्षा आधीच्या व्हाट्सअप चॅट वरून या अभिनेत्रींची चौकशी सुरु केली. या तीनही अभिनेत्रींचे फोन आता  NCB ताब्यात आहेत. या अभिनेत्रींन नंतर आता अभिनेत्यांचे सुद्धा नाव समोर येत आहेत.

यावर बरेच जण आपले मत मांडताना दिसत आहेत तर मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक केदार यशोधरा शिंदे यांनी आपल्या ट्विट च्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीची मराठी सिनेसृष्टी सोबत तुलना केली ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले कि, अभिमानाने सांगावं आणि स्वाभिमानाने मिरवावं असच काम हातून घडायला हवं. कारण मराठी मनोरंजन क्षेत्रात “माल”नाही तर, रसिकांचं “मोल” महत्वाचं ठरतं…. अशा शब्दात त्यांनी बॉलीवूड ची हिणवणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या : –