वर्ल्ड कपसाठी केदार जाधव झाला सज्ज

टीम महाराष्ट्र देशा : येत्या १५ दिवसांत क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ ला इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. त्यासाठी भारतीय टीम सज्ज झाली आहे. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याला आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान दुखापत झाली होती त्यामुळे तो वर्ल्ड कप खेळणार की नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. परंतु केदार आता दुखापतीतून सावरला आहे आणि खेळण्यासाठी सज्ज झाला आहे, अशी माहिती बीसीसीआयने आज दिली.

Loading...

आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती. निकोलस पूरणने टोलावलेला चेंडू अडवण्यासाठी केदारने डाइव्ह मारली. केदारने चेंडू अडवला, परंतु खांदा दुखावल्याने तो मैदानावर तसाच उभा राहिला. त्यानंतर जाधवने मैदान सोडले होते. त्यामुळे केदार जाधव वर्ल्ड कप खेळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु केदारने आता तंदुरुस्ती चाचणी पास केली आहे त्यामुळे तो भारतीय संघासोबत २२ तारखेला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे.

दरम्यान, केदार जाधव तंदुरुस्त झाल्याने भारताची मधल्या फळीची चिंता कमी झाली आहे. तसेच अंबाटी रायडू आणि रिषभ पंत यांच्या निवडीलाही पूर्णविराम मिळाला आहे. ५ जूनला भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

अशी आहे वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
माझी बदनामी करणारे 80 टक्के मराठा तरुण, आज मराठा समाजात जन्मल्याची लाज वाटते : तृप्ती देसाई
संज्याला मी चर्च गेट स्टेशनवर फाटक्या कपड्यात पेटी वाजवताना बघितलं होतं ; आज खात्री झाली : निलेश राणे
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
कोरोना इफेक्ट् : भारतात कंडोमच्या विक्रीत तब्बल ५० टक्क्यांनी वाढ
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं