पुण्यातील प्रसिद्ध ‘मराठे ज्वेलर्स’च्या कौस्तुभ मराठे यांना पोलिसांनी केली अटक

कौस्तुभ मराठे

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध ‘मराठे ज्वेलर्स’च्या कौस्तुभ मराठे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मंजिरी मराठे आणि कौस्तुभ मराठे यांनी ठेवीदारांना विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. मराठेंना 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मंजिरी कौस्तुभ मराठे आणि कौस्तुभ अरविंद मराठे यांनी 18 गुंतवणूकदारांची 5 कोटी 9 लाख 72 हजार रुपयांना फसवणूक केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. पुण्यातील पौड रोड शाखा आणि लक्ष्मी रोड शाखेत ही फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे.

या प्रकरणात आधी प्रणव मिलिंद याला अटक करण्यात आली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर मयत मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे, त्यांची पत्नी नीना मिलिंद मराठे यांच्यासह इतरांविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जानेवारी 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत मराठे ज्वेलर्सच्या पौड रोड आणि लक्ष्मी रोड शाखेत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे.

मंजिरी मराठे यांच्या बँक खात्यावर साक्षीदाराने गुंतवणूक केलेली रक्कम पाठवण्यात आली आहे. तसेच मंजिरी मराठे या 1 जुलै 2014 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत मराठे ज्वेलर्स संस्थेत भागीदार म्हणून सहभागी होत्या. आरोपींनी गुंतवणुकी पोटी साक्षीदार आणि इतरांना त्यांच्या पोचपावत्या दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या