पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती

पुणे : आयएएस अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर याची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. दिवेगावकर हे सद्या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदावर कार्यरत आहेत.

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी असणाऱ्या प्रेरणा देशभ्रतार यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार याबाबद्दल महापालिका वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. शासनाकडून आज राज्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

दिवेगावकर हे 2013 बॅचचे अधिकारी आहेत. यापूर्वी ते गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारीपदी कार्यरत होते. आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारीपदाचा पदभारही त्यांनी सांभाळला आहे. त्यानंतर त्यांची बदली जळगाव जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली होती.Loading…
Loading...