‘कौन बनेगा करोडपती’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बिग बी

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन १३ आता पडद्यावर येण्यास फार दूर नाही. लवकरच या लोकप्रिय शोचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवीन हंगामासह, नवीन स्पर्धक आणि सुपरहीरोच्या शैलीमुळे प्रेक्षकांची करमणूक वाढणार आहे. हा शो येत्या २३ ऑगस्टपासून प्रसारित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शोच्या नवीन हंगामासाठी नोंदणी प्रक्रिया १० मेपासून सुरू झाली होती. केबीसीमध्ये नशीब अजमावण्यास इच्छिणारे आजपासून या नोंदणी प्रक्रियेत भाग घेतले होते. त्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी अनेक प्रश्न विचारले होते. करोनामुळे कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाच्या स्वरुपामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. लाईफलाईनमधून ऑडियन्स पोल काढून टाकला आहे. हे पर्व देखील इतर पर्वांसारखे अधिक मनोरंजक करण्यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. कौन बनेगा करोडपती १३ मध्ये सूत्रसंचालक म्हणून अमिताभ बच्चनच असणार आहेत.

गेल्यावर्षी देखील कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण काळजी घेऊन केबीसीचे चित्रिकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधक नियमांचे अत्यंत काटेकोर पालन करण्यात आले होते. ‘कौन बनेगा करोडपती ‘ हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. दरवर्षी या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांचे स्वप्न पूर्ण होते, सोबतच अमिताभ बच्चन यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळते. या कार्यक्रमात स्पर्धक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. अनेक स्पर्धक कठीण परिस्थितीतून मार्ग काढत या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या बुद्धीच्या जोरावर लढतात.

महत्त्वाच्या बातम्या

IMP