Share

Katrina Kaif | सिंदूर, बांगड्या आणि लाल साडी नेसून कॅटरिना कैफने घातला पती विकी कौशलसाठी पहिल्या ‘करवा चौथ’चा घाट

मुंबई: काल देशभरातील महिलांनी करवा चौथ साजरा केला. देशात अनेक ठिकाणी या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक सेलिब्रिटीसह हा सण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. करवा चौथ निमित्त अनेक सेलिब्रिटीजने त्यांचे फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले. त्याचबरोबर अनेक अभिनेत्रींनी आपल्या पतीसाठी करवा चौथचा घाट घातला होता. बॉलीवूड सेलिब्रिटीज कडून शेअर करण्यात आलेल्या या इंस्टाग्राम पोस्टला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. यामध्ये रात्री उशिरा आपल्या अकाउंट वर शेअर केलेले पहिल्या करवा चौथ चे कॅटरिना कैफ चे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहे. काल कॅटरिनाने पती विकी सोबत तिचा पहिला करवा चौथ साजरा केला.

कॅटरिना कैफने इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या या पोस्टला तिने कॅप्शन दिले आहे, “पाहिला करवा चौथ”. पहिल्या करवा चौथच्या निमित्ताने कॅटरिना आपल्या पतीसाठी भरपूर नटलेली दिसत आहे. कॅटरिना ने पहिल्या करवा चौथसाठी चुडा, सिंदूर आणि लाल रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे. त्याचबरोबर विकी कौशल सुद्धा ऑफ-व्हाईट कलरच्या कुर्ता पायजमा मध्ये दिसत आहे. गुरुवारी रात्री कॅटरिना ने आपल्या पहिल्या करवा चौथच्या फोटो सेट इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. यामध्ये पहिला फोटो सेल्फी असून तो की कौशल द्वारे काढला गेलेला आहे.

तर, इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या या पोस्टच्या दुसऱ्या फोटोमध्ये कॅटरिना आणि विकी त्यांच्या आई-वडिलांसोबत म्हणजेच शाम आणि विना कौशल यांच्यासोबत दिसत आहे. त्यानंतर तिसऱ्या फोटोमध्ये कॅटरिना आणि विकी या जोडप्याचा सुंदर फोटो असून तिसऱ्या फोटोमध्ये कॅटरिनाने तिचा एक क्लोज-अप शॉट पोस्ट केला आहे.

करवा चौथा वर्षातून एकदा साजरा केला जातो. या सणाला स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करून उपवास पकडतात. लग्नानंतर पहिला करवा चौथा भारतामध्ये बहुसंख्य घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या सणाला  भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांनी गेल्या वर्षी राजस्थानमध्ये लग्न केले होते. त्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र यांचा समावेश होता. कॉफी विथ करण या शोमध्ये कॅटरिनाने सांगितली होती की, तिचे विकी सोबतचे नाते हे खूप वेगळे असून अनपेक्षित आहे. त्याचबरोबर याच शोमध्ये विकी कोशन म्हणाला होता की, “हे माझे नशीब होते आणि ते खरोखरच घडणार होते”. बॉलीवूडमधील या जोडप्याला दिवसेंदिवस चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई: काल देशभरातील महिलांनी करवा चौथ साजरा केला. देशात अनेक ठिकाणी या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक सेलिब्रिटीसह हा सण …

पुढे वाचा

Entertainment