हा अभिनेता निभावणार कपिल देवची भूमिका

१९८३ च्या वर्ल्ड कपचा थरार लवकरच सिल्वर स्क्रीनवर

१९८३ हे  वर्ष  भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिले गेले आहे. कारण ११८३ साली भारताने पहिला वर्ल्ड कप जिकंला. वर्ल्ड कपच्या विजयाचा थरार आता पुन्हा अनुभवता येणार आहे. लवकरच १९८३ च्या वर्ल्ड कपवर एक हिंदी चित्रपट बनविण्यात येणार आहे.

त्यावेळेचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कपिल देव यांची भूमिका रणबीर सिंग निभावणार असून कपिल देवच्या पत्नीच्या भूमिकेसाठी कतरिना कैफला विचारण्यात आले आहे. कबीर खान हा चित्रपट बनविणार असून यापूर्वी कतरिनाने कबीर खान सोबत न्यूयॉर्क’, ‘एक था टाइगर’आणि ‘फैंटम’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे कतरिना कपिल देवच्या पत्नी रोमी देवीच्या रोल मध्ये दिसू शकते.

ranveer-singh-playing-kapil-dev-kabir-khans-1983-world-cup-film