मुलीवर बलात्कार नाही, केवळ हत्या, यात राजकीय षडयंत्र ; साध्वी प्रज्ञा पुन्हा बरळल्या

टीम महाराष्ट्र देशा : “एवढं घृणास्पद कृत्य ज्याला बलात्कार म्हटलं जातं, तो झालाच नाही. तिची केवळ हत्या झाली, हे वैद्यकीय अहवाल सांगतो. हत्या कोणी केली याची माहिती नाही. एका मुस्लीमाने आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप करत त्यात एका हिंदूला अडकवलं. यापेक्षा बीभत्स राजकीय षडयंत्र असूच शकत नाही,” असे अकलेचे तारे साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी तोडले आहेत. गुजरातच्या नवसारीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हजेरी लावलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूरने वादग्रस्त विधान केलं आहे.

दरम्यान, कठुआ प्रकरणात पुराव्यांसोबत छेडछाडीची शक्यता लक्षात घेता, राज्य फॉरेन्सिक लॅबऐवजी पुरावे तपासणीसाठी दिल्लीच्या (FSL)लॅबमध्ये पाठवले. यात मुलीसोबत बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या आरोपींच्या डीएनए नमुन्यांवरुन सिद्ध होतं की, मंदिरातच मुलीसोबत क्रूरकृत्य झालं आहे. मात्र तरी सुद्धा साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी याप्रकरणी आपली अक्कल पाजळली आहे.

You might also like
Comments
Loading...