लष्करातील भरतीला काश्मिरी तरुणांनी उदंड प्रतिसाद ,111 जागांसाठी 2500 तरुणांचे अर्ज

टीम महाराष्ट्र देशा- पुलवामामध्ये झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. शहिदांच्या मृत्यूचा कोणत्याही परिस्थितीत बदला घ्या अशी जनभावना वाढीला लागली आहे.दहशतवादी संघटनांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तान विरोधात जनतेत आक्रोश निर्माण झाला आहे. जम्मू काश्मीरमधील वातावरण तणावपूर्ण बनलं असताना दुसऱ्या बाजूला भारतीय लष्कारात भरतीसाठी हजारो स्थानिक तरुणांनी एकच गर्दी केली होती.

बारामुल्ला येथे भारतीय लष्कराने 111 जागांसाठी भरती सुरू केली आहे. 111 जागांसाठी तब्बल 2500 तरुणांनी अर्ज करत लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
लष्करातील भरतीला काश्मिरी तरुणांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे.

Loading...