fbpx

‘मोदी आणि रॉय यांच्यामुळेच कश्मीरी तरुण पाकिस्तानच्या वाटेवर’

टीम महाराष्ट्र देशा – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेघालयचे राज्यपाल रॉय यांच्या आडमुठेपणामुळे कश्मीरी तरुण पाकिस्तानच्या वाटेवर जाऊ शकतात, असे खळबळजनक मत पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

नोकरी व शिक्षणानिमित्त इतर राज्यात राहणाऱ्या कश्मीरी विद्यार्थी आणि व्यापारांना संशयाने बघितले जात आहेत. या तरुणांचे संबंधही दहशतवाद्यांशी जोडण्यात येत आहेत. यावर पंतप्रधान काहीच बोलत नसल्याने आपण नाराज झालल्याचं मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले आहे. त्यांनी कश्मिरींवर बहिष्कार घालण्याचे विधान करणाऱ्या मेघालयाच्या राज्यपाल रॉय यांना तात्काळ पदावरून हटवण्याचीही मागणी केली.
तसेच पुलवामामध्ये जे काही झाले ते खेदजनक आहे. या दहशतवादी हल्ल्याला आम्ही कधीही विसरू शकणार नाही. पण या हल्ल्यानंतर कश्मीरी नागरिकांबरोबर जे काही होत आहे त्याबद्दल मुफ्ती यांनी खेद व्यक्त केला आहे.