नेवासा राष्ट्रवादी तालुका अध्यक्षपदी काशिनाथ नवले

नेवासा: नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सहकारी साखर करखानचे संचालक काशिनाथ आण्णा नवले यांची निवड झाल्याबदल भेंडा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता.  यावेळी  पंचायत समिती माजी उपसभापती तुकाराम मिसाळ , संरपच संगीता गव्हाण, अशोक मिसाळ हे  होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे बोलताना म्हणाले की भेंडा गावाच्या विकासासाठी काशिनाथ आण्णाचा खूप मोठा सहभाग आहे. सत्कार ला उत्तर देतांना कशिनाथ अण्णा नवले म्हणाले की जिल्हा अध्यक्षांनी जी माझ्या वर जबाबदारी दीली आहे ते काम मी नेटाने करणार आहे. सर्व तालुक्यातील नियुक्त्या ह्या लवकरात लवकर जाहीर केल्या जातील . असे देखील यावेळीस्पष्ट केले आहे . तालुक्यातील प्रत्येक गावात जाउन शाखा नव्याने सुरु करू. युवक संघटना मजबूत करून सगळयांना संधी देउ असेही ते बोलताना म्हणाले.