fbpx

सोलापूरमधून प्रकाश आंबेडकर लढणार ?, सुशीलकुमार शिंदेची डोकेदुखी वाढली

prakash aambedkar 1

टीम महाराष्ट्र देशा: सोलापूर लोकसभेसाठी कॉंग्रेसकडून माजी केंद्रीयमंत्री सुशील कुमार शिंदे यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर दुसरीकडे बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर हे सोलापूरमधून उभे ठाकणार असल्याचं बोलल जात आहे, खुद्द आंबेडकर यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदेची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन वंचित आघाडीला महाआघाडीत घेण्यासाठी कॉंग्रेस – राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे २२ जागांच्या मागणीवर प्रकाश आंबेडकर ठाम आहेत. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसने आंबेडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सोडल्याचं दिसत आहे.

अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का ? असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. यावेळी बहूजन वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी पूर्वीच मी सोलापूरमधून लढवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र तुम्ही विश्वास ठेवायला तयार नाही त्याला मी काय करू. असे सांगितले. तसेच पत्रकारांनी आणखीन एकदा विचारल्यानंतर आंबेडकर म्हणाले की ‘आत्तातरी पक्कं आहे, उद्या काय होईल माहिती नाही’