दारूबंदीसाठी महिलांनी ‘या’ ठिकाणी कसली कंबर

औरंगाबाद : कडेठाण बु. ता.पैठण येथे वर्षानुवर्षे सुरु असलेली अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी संतप्त महिलांनी गुरुवारी सकाळी येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करत निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

दोन दिवसापुर्वी येथील दारु सेवन करुन दुचाकी चालवित असतांना एका तरुणाचा गावातच दुचाकी घसरुन मृत्यू झाल्याने आज येथील रणरागिणींनीचा संयमाचा बाण तुटला व त्यांनी या अवैध दारु विक्री विरोथात यलगार पुकारुन जो पर्यंत अवैध दारु विक्री बंद होणार नाही तो पर्यंत गप्प बसणार नाही असा पवित्रा घेतल्याने येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

या आंदोलनाची बातमी समजताच पाचोड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी ताबडतोब गावात येऊन ग्रामपंचायतीत नागरिकांची बैठक बोलवली व त्यांना दारूविषयी मार्गदर्शन केले. यापुढे गावात कुणीही दारू विकणार नाही याची हमी दिली. तसेच यापुढे गावात कुणी दारू विकणार नाही. विकल्यास माझ्या पर्सनल नंबरवर मला फोन करून कळवा मी त्या व्यक्तीचे नाव गुपित ठेवले. आणि कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

दारु पिऊन चौका-चौकात उभे राहणाऱ्या तळीरामांचा षेथील महिलांना व शालेय विद्यार्थ्यींनीना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. ५० फुटांवर एक जिल्हा परिषदेची सातवीपर्यंतची शाळा आहे व एक हायस्कूल तिथे दहावीपर्यंतची शाळा आहे.या गावात गेल्या अनेक वर्षापासून चार ठिकाणी पोलीसांच्या आर्शिवादाने सर्रासपणे अवैध दारुविक्री सुरु आहे. यामुळे दारूपायी तरुण पिढी व्यसनाधीन होत असुन गावात तंटे वाढले आहेत. शिवाय दारु पिऊन चौका चौकात उभे राहणाऱ्या तळीरामांचा येथील महिलांना व शालेय विद्यार्थ्यींनीना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

तत्काळ येथील अवैध देशी दारू बंद करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई राठोड, वृशाली उंदयसिंह तवार, अर्चना तवार, सागरबाई तवार, सिंधुबाई तवार,निर्मला धनाईत, सुनिता कुंचेकर, कल्याणी तवार, मीराबाई तवार, मंदाबाई खरग, ज्योतीबाई तवार, आरती तवार, रंजना दाभाडे, मंदाबाई चौरे, चांगुनाबाई गोर्डे यांच्या सह महिला, पुरूषांच्या स्वाक्ष-या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :