कसाबनेचं केली करकरेंची हत्या, न्यायालयाचं शिक्कामोर्तब

टीम महाराष्ट्र देशा :  माजी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूची परत चौकशी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली . 26 नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शत्रूशी दोन हात करताना करकरे यांना वीरमरण आलं होते. मात्र करकरे यांचा मृत्यू उजव्या विचारसरणीच्या काही लोकांनी केला होता, अशी याचिका दाखल करण्यात आली होती.

याआधीही उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. बिहारमधील माजी आमदार . राधाकांत यादव यांनी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. हेमंत करकरे यांच्या मृत्यूची परत चौकशी व्हावी आणि त्यासाठी विशेष टीमची स्थापना करण्यात यावी अशीही विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली होती. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये दक्षिण मुंबईतील कामा रुग्णालयाजवळ हेमंत करकरे, वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक कामटे आणि विजय साळस्कर दहशतवादी अजमल कसाब आणि इस्माइलशी दोन हात करत असताना तिघांनाही वीरमरण आले होते. कसाब आणि इस्माइल यांनी त्यांच्या पोलीस व्हॅनवर गोळीबार केला होता आणि याच गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला होता.

भाजपकडून राजकिय फायद्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचा वापर – कॉंग्रेस  

Loading...

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...