आमदार झाल्यासारखं वाटतंय : पालकमंत्री बापटांच्या कसब्यात उदंड झाले इच्छुक

विरेश आंधळकर : लोकसभेसाठी भाजपने महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर केली आहे. यात चार विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आलेली आहेत. पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी पालकमंत्री गिरिश बापट यांना तिकिट देण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र देशा’ आजपासून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारी ‘आमदार झाल्यासारखं वाटतंय’ ही लेख मालिका सुरु करत आहोत. पहिल्या लेखासाठी निवडले आहे ते भाजपचा गड समाजाला जाणारा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा मतदारसंघ कसबा.

पुण्याची ग्रामदेवता असणारे कसबा गणपती, छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेला लाल महाल, पेशव्यांचा ऐतिहासिक शनिवारवाडा, मुलींची पहिली शाळा असणारा भिडे वाडा, तुळशीबाग, मानाचे पाचही गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती तसेच मूळ पुणे म्हणवला जाणारा पेठांचा परिसर कसबा विधनासभा मतदारसंघात समाविष्ट आहे. महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेनुसार संपूर्ण चार तर २ अर्धे प्रभाग कसबा मतदारसंघात येतात. १९८५ चा अपवाद वगळता १९७८ पासून कसब्यामध्ये जनता पार्टी आणि पुढे भाजपचे प्राबल्य राहिलेले आहे. १९७८ आणि १९८० मध्ये अरविंद लेले हे येथून विजयी झाले होते. १९९० मध्ये भाजपचे अण्णा जोशी विजयी झाले. तर १९९५ ते आजतागायत झालेल्या ५ निवडणुकांत गिरीश बापट यांनी कसब्यातून विजय मिळवला आहे.

Loading...

पूर्वी संपूर्ण शहरात कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे प्राबल्य असले तरी कसबा आणि भाजप हे समीकरण बनले होते. २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत संपूर्ण शहराप्रमाणे कसब्यात देखील भाजपला विजय मिळाला. बापट यांनी मागील २५ – ३० वर्षात मतदारसंघातील घराघरात आपले अढळ स्थान निर्माण केल्याने त्यांना लढत देताना विरोधकांची दमछाक होते. मात्र २००९ मध्ये मनसेच्या रवींद्र धंगेकर यांनी गिरीश भाऊंना जोरदार लढत दिली होती. त्यामुळे विरोधकांचे मनोबल उंचावले. परंतु २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत बापट हे तब्बल ४२ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. यामध्ये बापटांचा जनसंपर्क, मोदींची लाट आणि विखुरलेले विरोधक हे त्यांच्या पथ्यावर पडले आणि बापट थेट पालकमंत्री झाले. आता मागील इतिहास पाहिल्यानंतर पुढील भविष्याकडे वळूयात.

बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये कसब्यातील राजकारणात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. कधीनव्हे ते महापलिकेत पूर्ण बहुमत मिळालेल्या भाजपच्या पहिल्या महापौर बनण्याचा मान मुक्ता टिळक यांना मिळाला. महापौर पदावर विराजमान होताच आता मुक्ता टिळक यांना आमदारकीचे वेध लागल्याची चर्चा आहे. टिळक यांच्या जोडीने ३ वेळा नगरसेवक असणारे हेमंत रासने, संघ आणि भाजपमध्ये मजबूत संबंध असणारे धीरज घाटे, आजवरचे बापटांचे सुप्त विरोधक गणेश बिडकर हे पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत.

युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे आहे, मात्र २०१४ प्रमाणे युती न झाल्यास ऐनवेळी पळापळ होवू नये यासाठी शिवसेनेने देखील मागील दोन वर्षापासून जोरदार तयारी सुरु केली आहे. बापट यांचे शिष्य मानले जाणारे शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे हे देखील दोन वर्षापासून मोर्चेबांधणी करत आहेत. कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीमध्ये कसबा कॉंग्रेसकडे आहे. कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर, महापालिकेच्या वर्तुळातील आक्रमक आणि तेल लावलेला पैलवान समजले जाणारे अरविंद शिंदे, अथवा रोहित टिळक हे विधानसभेच्या मैदानात लढण्यासाठी सज्ज आहेत. आघाडी झाली असल्याने राष्ट्रवादीकडून कोण हा प्रश्न उरत नाही. तरीही आघाडी न झाल्यास राष्ट्रवादीकडून कोण चेहरा दिला जाणार हे अद्याप सांगता येत नाही. मनसेकडून माजी नगरसेविका रुपाली पाटील यांना संधी मिळू शकते.

आजवर कसब्यातून उमेदवारी देताना भाजप नेत्यांना जास्त विचार करावा लागला नाही. पण आगामी निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढू शकते. गिरीश बापट लोकसभेला गेल्यास उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच होणार हे निश्चित आहे. विरोधकांनी देखील भाजपला चीतपट करण्यासाठी जोरदार प्रयत्न लावले आहेत. त्यामुळे आजवर सर्वपक्षीय संबंधामुळे होणारा बापटांना फायदा इतर उमेदवारांना मिळेल कि नाही याबद्दल शंका आहे. हि सर्व भविष्यातील गणिते असल्याने तूर्तास तरी प्रत्येक इच्छुकांला आमदार झाल्यासारखं वाटतंय, हेच म्हणावे लागेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले