करुणानिधींना अंतिम निरोप देताना चेंगराचेंगरी

टीम महाराष्ट्र देशा : द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांना अंतिम निरोप देण्यासाठी चेन्नईच्या राजाजी हॉलबाहेर समर्थकांची प्रचंड गर्दी झाली आहे. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत. करुणानिधी यांच्यावर मरीना बिचवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मरीना बिचवर त्यांचा दफनविधी होणार आहे.

मरीना बीचवर करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास राज्य सरकारनं परवानगी नाकारली होती. यानंतर द्रमुकनं मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सकाळी सुनावणी झाली.

करुणानिधींच्या दर्शनस्थळावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाले आहेत. सध्या पोलिस आणि समर्थकांकडून गर्दीला पांगविण्यात येत आहे.