करुणा मुंडेंची सुटका लांबणीवर; १८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

karuna munde

मुंबई : करुणा मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना सोशल मीडियावर लक्ष्य करत त्यांच्यावर विविध आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. या दरम्यान ५ सप्टेंबरला करुणा परळीत आल्या होत्या. यावेळी त्यांच्या गाडीत बंदूक सापडल्याचेही समोर आले. तसेच हायव्होल्टेज ड्रामा घडून जिवे मारण्याची धमकी व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी करुणा मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. तसेच न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. या सर्व प्रकारामुळे राज्यभरात कोलाहल माजलेले आहे.

त्यातच करुणा मुंडे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र ही न्यायालयीन कोठडी आता १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत न्यायालयीन कोठडी वाढवण्य़ाचा निर्णय घेतला. या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. यामुळे करुणा शर्मा यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्कात आता वाढला आहे. तपास अधिकारी प्रत्यक्षात हजर नसल्याने ही तारीख वाढवण्यात आली आहे.

तसेच करुणा मुंडे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकीलांनी जमिनासाठी अंबाजोगाई कोर्टात अर्ज दाखल केला होता. याच जामिनाच्या अर्जावर आज अंबाजोगाई कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. मात्र सुनावणी दरम्यान करुणा मुंडे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे करुणा मुंडेंची सुटका आता लांबणीवर पडली असल्याची पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या