जे दिशा बरोबर झाले आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही ? : करुणा मुंडे

karuna munde

मुंबई- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणासोबतच वनमंत्री संजय राठोड यांचं नावंही जोडलं गेल्यानं गेल्या काही दिवसांपासून राठोड बेपत्ता आहेत.

वनमंत्री संजय राठोड यांचे या प्रकरणाशी संबध असल्याचे आरोप होत असल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या प्रकरणाशी संबंधित कथित ऑडिओ क्लिप्स देखील व्हायरल झाल्याने हे प्रकरण अधिकच गूढ होत चाललं आहे. तर, पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.

ही घटना घडल्याच्या दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड हे गायब आहेत.त्यांचा फोनही लागत नाही. या आरोपांवर त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्याने संशय अधिक बळावत आहे.दरम्यान,या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर चौफेर टीका होत असताना जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. पूजा चव्हाणला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यामतून घेतली आहे.

करुणा मुंडे यांनी म्हटले आहे की, जे दिशाबरोबर झाले आहे, तेच पूजाबरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही. आम्ही न्याय मागतो भीक नाही. पूजा चव्हाण यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. पूजा चव्हाण यांना न्याय भेटलाच पाहिजे अशी जोरदार मागणी केली आहे.

दरम्यान,पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलीस नीट तपास करत नाही, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीआरोप केला आहे. राज्यातील मंत्र्यांच्या संपर्कात जर संजय राठोड असतील तर त्यांनी पोलिसांना त्यांचा पत्ता द्यावा, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या