करुण नायर ची 303 धावांची विक्रमी खेळी

इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा खेळाडू करूण नायर याने ट्रिपल सेंच्युरी करण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याने दरदार खेळी करत भारताला मोठी लीडही मिळवून दिली आहे. त्याचं या ट्रिपल सेंच्युरीसाठी सर्व स्तरातून मोठं कौतुक केलं जात आहे. या ट्रिपल सेंच्युरी करणारा दुसरा भारतीय क्रिकेटर ठरला आहे. याआधी विरेंदर सेहवाग याने ट्रिपल सेंच्युरीची कामगिरी केली आहे. कालच्या सामन्यात के राहुल याचे द्विशतक हुकले. पण करूण आणि राहुल यांच्या दमदार खेळीने भारताची स्थिती मजबूत केली आहे.  सामन्यात दोघांनी १६१ रन्सची पार्टनरशीप केली आहे.करूण नायर दमदार खेळी करत ३०० रन्स केले आहेत. त्यामुळे तो आता टीम इंडियाचा तीन नंबरचा फलंदाज झाला आहे.