भारताचा पहिला डाव ६ बाद ७५९ धावांवर घोषित

करुण नायरने त्रिशतकी विक्रम केला असतानाच भारतीय संघानेही कसोटी क्रिकेटमधील आपल्या सर्वाधिक धावांचा जुना विक्रम मोडीत काढला. करुण नायर (नाबाद ३०३), लोकेश राहुल (१९९), पार्थिव पटेल (७१), अश्विन (६६) आणि रवींद्र जडेजा (५१) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने चेन्नई कसोटीत आपला पहिला डाव ६ बाद ७५९ धावांवर घोषित केला.
भारतीय संघाने २०१० साली श्रीलंकेविरुद्ध रचलेला ७२६ धावांचा वैयक्तिक विक्रम मोडीत काढला. भारताने पहिल्या डावात इंग्लंडवर २८२ धावांची आघाडी घेतली आहे.  प्रत्युत्तर दखल इंग्लंडने दुसऱ्या डावात चौथ्या दिवस अखेर बिनबाद १२ धावा केल्या आहेत.
You might also like
Comments
Loading...