वारीवर निर्बंध असल्यास उपमुख्यमंत्र्यांनीही पूजा करु नये, वारकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

wari pawar

पंढरपूर : राज्य शासनाने विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नका, असे आदेश दिले आहेत. कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, 26 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. या वारीसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून शेकडोंच्या संख्येने दिंड्या आणि पालख्या पंढरीत होत असतात. या सर्व सोहळ्यांना राज्य शासनाने घातली बंदी, आषाढी यात्रेनंतर कार्तिक वारी ही निर्बंधातच होणार आहे.

येत्या 26 नोव्हेंबर रोजी पंढरपूरची कार्तिकी वारी आहे. पंढरपूरमध्ये भरणाऱ्या चार वाऱ्यातील ही क्रमांक दोनची वारी आहे. साधारण पाच ते सात लाख वारकरी भाविक या वारीला हजेरी लावतात. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक एकत्रित जमले तर कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावू शकतो आणि वारीला येणाऱ्या भाविकांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो. ही शक्यता गृहीत धरुन राज्य शासनाने कार्तिकीला येणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांना बंदी घातली आहे.

दरम्यान, चार महिन्यांपूर्वी झालेल्या आषाढीवारीला असे नियम लावण्यात आले होते आणि वारी प्रातिनिधिक स्वरुपात साजरी करण्यात आली होती. यावेळी कार्तिकी वारी देखील प्रातिनिधिक स्वरुपात साजरी करण्याच्या हालचाली वारकरी संप्रदायात सुरु आहे.

तर दुसरीकडे कार्तिकी यात्रेसाठी पंढपुरात २२ नोव्हेंबर रात्री १२ पासून २६ नोव्हेंबरपर्यंत एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तर २५ नोव्हेंबर रात्री १२ पासून २६ नोव्हेंबर रात्री १२ पर्यंत शहर व परिसरातील ५ किलोमीटर अंतरापर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे.

त्यानंतर आज पंढरपुरात वारकरी समन्वय समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत कार्तिकी वारीवर निर्बंध असल्यास उपमुख्यमंत्र्यांनीही पूजा करु नये असा आक्रमक पवित्रा वारकऱ्यांनी घेतला आहे. तर यापुढील मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय एकमुखाने या बैठकीत घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या