कार्तिक आर्यनचा नवा चित्रपट ‘कॅप्टन इंडिया’, हंसल मेहता करणार दिग्दर्शन

कार्तिक आर्यनचा नवा चित्रपट ‘कॅप्टन इंडिया’, हंसल मेहता करणार दिग्दर्शन

kartik aaryan

मुंबई : निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या दोस्ताना-२ मधून बाहेर पडल्यावर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला चित्रपटासाठी संघर्ष करावा लागू शकतो असा सर्वांचा समज होता. मात्र काही दिवसातच सुप्रसिद्ध निर्माता साजिद नाडियादवाला यांनी त्याला त्यांच्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेत संधी दिली. ही बातमी ताजी असतानाच कार्तिक आर्यनला आणखी एक चित्रपट मिळाला आहे.

सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी कॅप्टन इंडिया या चित्रपटात कार्तिकची वर्णी लागली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी कार्तिक आर्यन साजिद नाडियादवाला प्रोडक्शन निर्मित सत्यनारायण की कथा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी चित्रपट दिग्दर्शक समीर विद्वांस हे करणार आहे. हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे. सत्यनारायण की कथा चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतल्यामुळे या चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिग्दर्शक हंसल मेहता हे बॉलिवूड मधील एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. गेल्या वर्षी आलेल्या त्यांच्या स्कॅम १९९२ या वेब सिरीज ने लोकप्रियतेचा उच्चांक मोडीत काढला होता. यापूर्वी त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर त्यांनी वेब सिरीज बनवली होती. ही वेब सिरीज खूप गाजली होती. तसेच अलिगढ, ओमेरेता, छलांग, शहीद यासारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहे.

महत्वाच्या बातम्या