fbpx

पी. चिदंबरम यांना राजकीय सूडबुद्धीने अटक, पुत्र कार्ती चिदंबरम यांचा थयथयाट

टीम महाराष्ट्र देशा : आयएनएक्स मीडिया घोटाळ्य़ाप्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री दोन तास चाललेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर चिदंबरम यांना अटक झाली. त्यांना अटक होताच कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

पी. चिदंबरम यांना केवळ राजकीय सूडबुद्धीने अटक झाली असल्याचा आरोप त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी केला असून आयएनएक्स मीडियाचे प्रवर्तक पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्याशी त्यांचे कुठलेही हितसंबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

चिदंबरम यांना काल रात्री नाट्यपूर्ण घडामोडींनंतर अटक झाल्यानंतर कार्ती आज सकाळी चेन्नईहून दिल्लीत आले, तेव्हा ते विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. या अटकेच्या निषेधार्थ आपण जंतरमंतर इथं आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जमीन नाकारल्यानंतर गेल्या ७२ तासापासून ईडी आणि सीबीआय त्यांचा शोध घेत होती. अखेर काल रात्री त्यांना अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या