पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना अटक

टीम महाराष्ट्र देशा : माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने चेन्नई विमानतळावर अटकेची कारवाई केली. आयएनएक्स मीडिया प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आयएनएक्स मीडिया मनी लाँण्डरिंग प्रकरणी सुरु असलेल्या तपासात कार्ती चिदंबरम सहकार्य करत नसल्याचा सीबीआयचा आरोप आहे.कार्ती चिदंबरम लंडनहून परतत असताना त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली.

Loading...

कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता. कार्ती चिदंबरम यांच्यावर शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते.Loading…


Loading…

Loading...