Share

Shehzada Teaser Release | कार्तिक आर्यनच्या ॲक्शन फिल्म ‘शहाजादा’चा टिझर रिलीज

मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आज त्याचा 32 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. कार्तिकच्या या खास प्रसंगी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी कार्तिकने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक रिटर्न गिफ्ट दिले आहे. कार्तिकने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी चित्रपट ‘शहजादा’ (Shehzada) चा टिझर रिलीज केला आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन पहिल्यांदाच रोमान्स आणि कॉमेडी न करता दमदार ॲक्शन करताना दिसणार आहे.

कार्तिक आर्यनच्या ॲक्शन फिल्म ‘शहाजादा’ (Shehzada) चा टिझर रिलीज

कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून ‘शहजादा’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. चित्रपटाचा टिझर शेअर करत त्याने त्याला कॅप्शन दिले आहे की,”कुटुंबाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही चर्चा करत नाही आम्ही ॲक्शन करतो.” ‘शहजादा’ या चित्रपटाचा टिझर खरोखरच अप्रतिम आहे. या टिझरमध्ये कार्तिक आर्यन ॲक्शन करताना दिसत आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये कार्तिकसह कृती सेनन (Kriti Sanon) सुद्धा दिसणार आहे. कृती टीझरमध्ये एका ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.

‘शहजादा’ या चित्रपटाचा टिझर बघून चाहते सोशल मीडियावर कार्तिक आर्यनचे कौतुक करताना दिसत आहे. त्याचबरोबर चाहत्यांना हा चित्रपट कधी रिलीज होईल याची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांना जास्त वाट बघावी लागणार नाही. कारण हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडेच्या तेलगू सुपरहिट ‘अला वैकुंठापुरमलो’चा रिमेक आहे.

शहजादाच्या आधी कार्तिक आर्यन आणि कृती सेनन ही जोडी पहिल्यांदा लुका छूपी या चित्रपटांमध्ये दिसली होती. तेव्हापासून कार्तिक आणि कृती ही जोडी लोकप्रिय झाली आहे. आता पुन्हा हे दोघे एकत्र येत आहे. कृती आणि कार्तिक या दोघांना चाहते मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र पाहण्यास आतुर झाले आहे. अशा परिस्थितीत कृती आणि कार्तिक ‘शहजादा’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आज त्याचा 32 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. कार्तिकच्या या खास प्रसंगी …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now