आता तरी कार्यकर्त्यांना भेटू द्या; कॉंग्रेस आमदारांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हत. मात्र भाजप १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यांना बहुमतासाठी आणखी ८ जागांची आवश्यकता होती. तर दुसरीकडे कॉंग्रेसने जेडीएसला पाठींबा देत राज्यपालांकडे सत्ता स्थापण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांनी कॉंग्रेस एवजी भाजपला सत्ता स्थापण्यासाठी बोलावल्याने कॉंग्रेसने या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार भाजपला बहुमत सिद्ध न करता आल्याने भाजपने सत्ता गमावली.

दरम्यान भाजपला बहुमत सिद्ध करण्याच्या वेळेस आमदार फुटून घोडेबाजार होऊ शकतो ही शक्यता गृहीत धरून कॉंग्रेस आणि जेडीएसने आपल्या सर्व आमदारांना अज्ञात स्थळी हलवले होते. दरम्यान अजून कॉंग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेसाठी बहुमत सिद्ध करायचे असल्याने आमदार अद्यापही अज्ञात स्थळीच आहेत. या आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांना भटू देण्याची मागणी कॉंग्रेसकडे केली आहे.

सध्या काँग्रेसचे आमदार एका हॉटेलात तर जनता दलाचे आमदार एका रिसॉर्टमध्ये आहेत. निवडून आल्यापासून ते घराबाहेर आहेत.विजयी झाल्यानंतर मतदारसंघात मिरवणुका काढायला त्यांना वेळही मिळाला नाही आणि कार्यकर्त्यांचे आभार मानणे शक्य झाले नाही.

कार्यकर्ते सोडा, पण किमान मतदारांचे आभार मानायला तरी आम्हाला मतदारसंघात जायचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर बहुमत सिद्ध व्हावे, अशी आमची इच्छा आहे. आता आम्हाला लवकर घरी जायचे आहे, असे आमदारांनी नेत्यांनाच सांगितले आहे. सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार व काँग्रेसचे निरीक्षक खा. वेणुगोपाळ यांनी या आमदारांशी गप्पा मारल्या. तेव्हा आमदारांनी ही मागणी केली.Loading…
Loading...