fbpx

Karnataka Election : कर्नाटकच्या विजयाचा पुण्यात महापौरांनी वाजवला ढोल !

पुणे: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने विजय हस्तगत करण्याकडे वाटचाल केली आहे. या विजयानंतर पुण्यामध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यापुढे विजयाचा जल्लोष केला आहे. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी ढोल वाजवत तर शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ताशाचे वादन करत विजय साजरा केला आहे.

सध्या भाजपा १२० जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा पार केलेल्या भाजपाकडून देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर (जेडीएस) किंगमेकर ठरण्याची शक्यता सर्वच मतदानोत्तर चाचणीत दिसून आली होती. परंतु, देवेगौडा यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. कारण बहुमताकडे वाटचाल करत असलेल्या भाजपाने आम्हाला जेडीएसची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

1 Comment

Click here to post a comment