बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची नात तिच्या बंगळुरू येथील घरी मृतावस्थेत आढळून आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय सौंदर्या लटकलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी ‘अनैसर्गिक मृत्यू’चा गुन्हा दाखल केला आहे. सौंदर्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे, मात्र तपास सुरू आहे.
सौंदर्या ही बीएस येडियुरप्पा यांची मोठी मुलगी पद्मावती यांची मुलगी आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. सौंदर्या एक डॉक्टर होती. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.
The postmortem of Soundarya, the granddaughter of former Karnataka CM BS Yediyurappa’s granddaughter, is underway at Bowring and Lady Curzon Hospital in Bengaluru. She was found hanging at a private apartment in Bengaluru.
Visuals from the hospital. pic.twitter.com/tgBW52E9Rt
— ANI (@ANI) January 28, 2022
खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ.सौंदर्या यांनी हे पाऊल का उचलले, हे अद्याप समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, भाजपनेते येडियुरप्पा यांची दुसरी मुलगी पद्मावती यांची मुलगी सौंदर्या हिचा विवाह त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉ. नीरज एस यांच्याशी २०१८ मध्ये झाला होता. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास नीरज ड्युटीवर निघाला होता आणि त्यानंतर दोन तासांनी सौंदर्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर यावर काय निर्णय घ्यायचा हे ठरवू- अनिल परब
- चिकलठाणा ते जिजाऊ चौक उजळून निघणार; आदित्य ठाकरेंनी केले प्रकाशमान रस्त्याचे उद्घाटन!
- …अशा प्रकारचे निलंबन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही- देवेंद्र फडणवीस
- “सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही”, निलंबन मागे घेतल्यानंतर अशिष शेलारांची प्रतिक्रिया
- चंद्रकांत योगा लॉन्स अन् इम्तियाज सूर्यकुंड शेजारी-शेजारी; औरंगाबादेत पांडेयजींनी केली कमाल!