कर्नाटकच्या रणसंग्रामाला सुरुवात ; १2 मे रोजी मतदान, 15 तारखेला मतमोजणी

कॉंग्रेससाठी अस्तिवाची तर भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई

कॉंग्रेससाठी अस्तिवाची तर भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई बनलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. २२४ विधनासभा मतदारसंघ असणाऱ्या कर्नाटकमध्ये १२ मे रोजी मतदान होणार आहे तर १५ मे रोजी मतमोजणी घेतली जाणार असल्याच निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आल आहे. निवडणुकीत ईव्हीएम मशिन्ससोबतच व्हीव्हीपॅट मशिन्सचाही वापर केला जाणार आहे.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांतील विजयानंतर भाजपचा विजय रथ संपूर्ण देशभरात धावतो आहे. उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या राज्यापासून ते त्रिपुरा सारख्या छोट्या राज्यातही भाजपने विजय संपादन केल आहे. आता कर्नाटक राज्य जिंकण्यासाठी भाजपमधील चाणक्य कामाला लागले आहेत.

तर सध्या कर्नाटकात कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. देशभरात पराभवाला समोर जाव लागल्याने आगामी लोकसभा निवडणुका पाहता काँग्रेसच्यादृष्टीने ही अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. मुख्यमंत्री  सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस निवडणूक लढवणार आहे, तर बी.एस. येडियुरप्पां यांना मुख्यमंत्रिपदासाठी पुढे करून भाजप प्रचाराला लागली आहे. दरम्यान, मागील आठवड्यातच  मुख्यमंत्री  सिद्धरामय्या यांच्याकडून खेळण्यात आलेल्या वेगळ्या लिंगायत धर्माच्या खेळीचा  फायदा कॉंग्रेसला होतो का? हे पाहन महत्वाच ठरणार आहे.

कर्नाटक विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल  

एकूण जागा २२४

कॉंग्रेस १२२

भाजप ४०

जेडीएस ४०

अन्य २२

 

You might also like
Comments
Loading...