विरोधकांची एकजूट कुमारस्वामींच्या शपथविधीला शरद पवारांची हजेरी

Sharad-Pawar

टीम महाराष्ट्र देशा : जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. कुमारस्वामी बुधवारी (23 मे) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. त्यामुळेच कुमारस्वामी जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तेव्हा विरोधी पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. देशभरातील प्रमुख 17 विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठवले असल्याची माहिती आहे. या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भाजपाला एकजुटीचा इशारा देण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे.

कुमारस्वामी यांनी नंतर मायावती यांचीही भेट घेतली. मायावतीही बुधवारी शपथविधीला येणार आहेत. कुमारस्वामी यांनी मार्क्सवादी तसेच भाकपा नेत्यांनाही निमंत्रण दिले. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, तामिळ अभिनेते रजनीकांत, सीताराम येचुरी हेही नेते शपथविधीला हजर राहतील, असे सांगण्यात येते. बाकी सर्व विरोधी पक्षांचे बडे नेतेही येणार असल्याने शपथविधीला विरोधकांचे शक्तिप्रदर्शनच मानले जात आहे.