कर्नाटक रणसंग्राम २०१८ : विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक विधानसभेसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारांनी काल शक्तीप्रदर्शन करत निवडणूक अर्ज दाखल केले. २७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येतील.

कर्नाटक विधानसभा निवडणूक २२४ जागांसाठी एकाच दिवशी म्हणजे १२ मे रोजी मतदान होणार आहे. कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथील मतदारसंघातून आपला दुसरा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दक्षिण कर्नाटकामधील चामुंडेश्वरी येथील मतदारसंघातून त्यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे.