कर्नाटक रणसंग्राम; ओपिनियन पोलमध्ये भाजपला झटका तर कॉंग्रेसला ‘अच्छे दिन’

मुख्यमंत्री सिद्धरामय्या

टीम महाराष्ट्र देशा: देशभरात भाजपचा विजयरथ दौडत आहे. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला झटका बसण्याची शक्यता ओपिनियन पोलमधून दिसत आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईटस यांनी एकत्रित केलेल्या सर्वेनुसार कर्नाटकात आज निवडणुका झाल्यास काँग्रेला २२५ पैकी १०१ पर्यंत जागा मिळण्याची शक्यता ओपिनिअन पोलद्वारे वर्तवण्यात आली आहे. तर भाजपच्या जागांमध्ये देखील वाढ होणार असून ७८ ते ८६ पर्यंत पोहोचतील

Loading...

पुढील महिन्यात १२ मे रोजी कर्नाटकात विधानसभेची निवडणूक होणार आहे. राज्यात कॉंग्रेसचे सरकारअसून ओपिनिअन पोलनुसार जनता पुन्हा कॉंग्रेसलाच संधी देणार असल्याच दिसत आहे. सध्या कॉंग्रेसकडे २२५ पैकी जागांपैकी त्यांच्याकडे १२२ जागा आहेत. तर भाजपकडे ४३, जनता दल सेक्युलरकडे २९, इतर पक्षांचे १४ आमदार असून १६ जागा रिक्त आहेत.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...