नगर : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कर्नाटक पॅटर्न’?

टीम महाराष्ट्र देशा – सुरुवातीपासून चुरशीच्या ठरलेल्या अहमदनगर महापालिकेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. ६८ जागांपैकी २४ जागा जिंकून शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर १८ जागा जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजप ने  १४ जिंकल्या असून काँग्रेसला फक्त ५ जिंकता आल्या आहेत. बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता असल्याने सत्तेची समीकरणे कश्या प्रकारे जुळवली जातील हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान नगरमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी  ‘कर्नाटक पॅटर्न’  वापरला जावू शकतो अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. कर्नाटकमध्ये ज्याप्रमाणे कुमारस्वामी यांच्या पक्षाबरोबर आघाडी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले त्यापद्धतीने नगरमध्येदेखील हा प्रयोग केला जाऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.  शिवसेनेला सोबत घेवून आघाडी भाजपला शह देतेय का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

सत्ता स्थापनेसाठीचे पर्याय

१) अहमदनगरमध्ये सत्ता स्थापण्यासाठी पहिला पर्याय भाजप आणि शिवसेनेच्या य़ुतीचा आहे. शिवसेना-भाजप एकत्र आल्यास स्पष्ट बहुमताचा ३५ आकडा गाठणं शक्य आहे.

२) दुसरा पर्याय आघाडीचा असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येवूनही बहुमताचा आकडा गाठणं जवळपास अशक्य आहे. इतरांना एकत्र आणलं तरी ३५ चा आकडा गाठणं शक्य दिसत नाही.

३) भाजप-शिवसेनेची युती झाली नाही तर राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्यास सत्तेचा पर्याय देखील असू शकतो.

४) राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले तर सत्तेचा तिसरा पर्याय खुला होऊ शकतो.

अहमदनगर : शिवद्रोही श्रीपाद छिंदम विजयी !