fbpx

येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी राहणार की जाणार?; आज होणार फैसला

बंगळुरू : कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर काल सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात येडियुरप्पांचा असंविधानिक पद्धतीने होणारा शपथविधी रोखण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. राज्यपालांचा विशेषाधिकार असल्याने त्यांच्या निर्णयाविरोधात जाऊन आम्ही येडियुरप्पांचा शपथविधी रोखू शकत नाही, मात्र, त्यावर सुनावणी घेण्यात येईल असे १७ तारखेला मध्यरात्री सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. तसेच येडियुरप्पांना बहुमताचा आकडा दाखवणाऱ्या आमदारांच्या नावांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते.

आज ते पाठींबा असणाऱ्या आमदारांची यादी न्यायालयात सादर करणार आहेत. सत्ता स्थापनेवरुन कर्नाटकात निर्माण झालेला पेच आज सुटण्याची शक्यता आहे. कारण यासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज फैसला होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पा किती काळ आपल्या पदावर राहणार की काँग्रेसचा पाठींबा असलेला उमेदवार मुख्यमंत्री बनणार हे आज स्पष्ट होईल.