काँग्रेस, जेडीएसचे २० आमदार आम्हाला पाठींबा देणार; भाजपचा दावा

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आज बी. एस. येडियुरप्पा विश्वास दर्शक ठरावाला समोर जाणार आहेत.त्यांच्यापुढे बहुमत सिद्ध करण्याच मोठ आव्हान असणार आहे.

दरम्यान कर्नाटक विधानसभेत आज होणाऱ्या बहुमत चाचणीत काँग्रेस व जनता दल सेक्युलर या पक्षातील लिंगायत समाजातील २० आमदार भाजपाला साथ देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येडियुरप्पा हे लिंगायत समाजातील असल्याने विरोधी बाकांवरील २० आमदार आम्हाला मतदान करतील, असा दावा भाजपाकडून केला जात आहे.

कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने भाजपाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना शुक्रवारी दिले होते. यानंतर कर्नाटकमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येण्याची शक्यता आहे. आता अवघ्या काही तासांमध्ये भाजपाला विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागेल. चाचणीत भाजपा बहुमताचा आकडा कसा गाठणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...