fbpx

ज्योतिषाने सल्ला दिला म्हणून ‘हे’ मंत्री महोदय करतात रोज ३६0 किलोमीटरचा प्रवास

बंगळुरू : कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाममंत्री एच.डी. रेवण्णा यांना, तुम्हाला सरकारी बंगल्यात राहण्यास अडचण नाही, पण स्वत:च्या घरात राहू नका नाहीतर अनर्थ होईल असा अजब सल्ला एका ज्योतिषाने दिला आहे. त्यामुळे रेवण्णा बंगळुरूला स्वतःच्या मालकीचं घर न घेतला दररोज होळेनरसीपूर ते बंगळुरू असा सुमारे ३६० किलोमीटरचा प्रवास आपल्या कारमधून करतात त्यासाठी त्यांना दररोज सुमारे ६ ते ७ तासांचा वेळ लागतो आहे.

रेवण्णा हे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे मोठे बंधू आहेत. त्यांना सरकारी बंगला सहज मिळू शकतो, मात्र त्यांना पाहिजे तो सरकारी बंगला अद्याप माजी सार्वजनिक बांधकाममंत्री महादेवप्पा यांच्याकडेच आहे. तो रिकामा करण्यास त्यांनी तीन महिन्यांची मुदत मागितली आहे. त्यामुळे आणखी तीन महिने रेवण्णा यांना रोज साडेसहा तास प्रवास करावा लागेल, असे सांगण्यात येत आहे.

ते रोज होळेनरसीपूर गावातील घरीच झोपायला जात आहेत. रोज इतका प्रवास करण्यासाठी रेवण्णा सकाळी ५ वाजता उठतात. आधी पूजा करतात, मग चहा-नाश्ता झाल्यानंतर ८ वाजेपर्यंत मतदारसंघातील लोकांना भेटतात, त्यांच्या तक्रारी जाणून घेतात. मग ८ वाजता बंगळुरूला जायला निघतात. बंगळुरूत कार्यालयातील कामे आटोपून ते रात्री ९ वाजता पुन्हा गावाकडे निघतात. घरी पोहोचपर्यंत मध्यरात्र होते मात्र त्यांच्या अत्यंत विश्वासू ज्योतिषाने सल्ला दिला असल्यामुळे ते स्वतःच्या मालकीचं घर घेणार नसल्याचं सांगण्यात येतय.

भय्यूजी महाराजांच्या मृत्यूला आयुषीचं जबाबदार; पोलिसांना मिळाले पत्र

अन्नदात्याला बॉलीवूडकरांचा पाठींबा; रितेश ने दिला ‘जय किसान’चा नारा