‘देशद्रोही लोकांना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजेत’

टीम महाराष्ट्र देशा- दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाही सुरू आहे. भाजपकडून वादग्रस्त विधाने करून वाद निर्माण करण्याचे सत्र सुरूच आहे. आधी अनुराग ठाकूर मग प्रवेश वर्मा आणि आता कर्नाटकातील मंत्री सीटी रवी यांनी उधळलेल्या मुक्ताफलांमुळे भाजपच्या डोकेदुखीत भर पडली आहे.

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री अनुराग ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असली तरी, भाजपचे नेते त्यांचं समर्थन करत आहेत. कर्नाटकातील मंत्री सीटी रवी यांनी अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. देशद्रोहींना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजेत, असं ट्विट करून रवी यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Loading...

‘जे लोक केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी देशद्रोहींविरोधात केलेल्या वक्तव्यावर टीका करत आहेत, ते लोक दहशतवादी अजमल कसाब आणि याकूब मेमन यांच्या फाशीला विरोध करत होते. तुकडे-तुकडे गँगचं समर्थन करत आहेत आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात खोटं पसरवत आहेत. मी अनुराग ठाकूर यांच्या सोबत आहे,’ असं रवी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'