काँग्रेस टिपू सुलतानची भक्ती करत आहे – योगी आदित्यनाथ

YOGI_Adityanath

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात आणि हिमाचलमध्ये जोरदार यश मिळवल्यानंतर भाजपने आता आपल पुढच लक्ष ठेवलं आहे ते म्हणजे कर्नाटक राज्य. कर्नाटक राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभांच्या निवडणुका होत आहेत. याच दृष्टीकोनातून भाजपचे स्टार प्रचारक आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोर्चा आता कर्नाटककडे वळवला आहे. कर्नाटक ही हनुमानाची भूमी असून इथे टिपू सुलतानची कशी काय जयंती होते? अस विधान करत आपल्या प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे. भाजपच्या परिवर्तन यात्रेदरम्यान ते बोलत होते.

योगी आदित्यनाथ यांनी ‘कर्नाटक ही हनुमानाची भूमी आहे. विजनगर हे पूर्वीचे हनुमानाचे राज्य होते. राज्यातील सध्याचे काँग्रेस सरकार हनुमानाची भक्ती करण्यापेक्षा टिपू सुलतानची भक्ती करत आहे हे दुर्दैवी आहे’ असा आरोप करत कर्नाटकातील निवडणूक ही धार्मिक आधारावरच लढली जाण्याची शक्यता निर्माण केली आहे.