भाजपला शह देण्यासाठी कॉंग्रेसची खेळी; स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीला हिरवा कंदील

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच भाजप आणि सत्ताधारी कॉंग्रेसमध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरु झाल्याच दिसत आहे. यातच राज्यामध्ये बहुसंख्य असणाऱ्या लिंगायत समाजाची वोटबँक आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

Loading...

देशभरातील लिंगायत समाजाच्या वतीने स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी जोरदारपणे केली जात आहे. याच संदर्भात काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या समितीची स्थापना केली होती. आज न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अहवालातील शिफारसीला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पुढील निर्णयासाठी आता धर्म मान्यतेचा चेंडू केंद्र सरकारच्या गोटात ढकलण्यात आला आहे.

कर्नाटक भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री बी एस येडूरप्पा हे लिंगायत समजातून येतात. त्यामुळे त्यांचा जनाधार कमी करण्यासाठी कॉंग्रेसकडून लिंगायत कार्डचा वापर केला जात आहे. कर्नाटकमध्ये एकूण लोकसंख्येच्या १८ टक्के लोक्संख्यान ही लिंगायत समजाची आहे. तसेच तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातही लिंगायत समाजाची मोठी संख्या आहे.Loading…


Loading…

Loading...