कर्नाटकच्या राज्यपालांनी राजीनामा द्यावा – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटकच्या राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवावी, त्यांनी लोकशाहीवर आघात करण्याचे  काम केलं,त्यामुळे ते राजीनामा देतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना अपयश आले आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज कर्नाटक विधानसभा सभागृहात भाजपला विश्वासदर्शक ठराव मांडायचा होता. मात्र, दिवसभराच्या पळापळीनंतर देखील भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याच दिसल्याने येडीयुरप्पा यांनी आपण राजीनामा देत असल्याच घोषित केले.

कर्नाटकच्या राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवावी, त्यांनी लोकशाहीला आघात देण्याचे काम केलं ,त्यामुळे ते राजीनामा द्यावा. लोकशाहीला आघात देण्याचे काम राज्यपालांनी केलं.त्यांच्या पदाची प्रतिष्ठा त्यांनी ठेवावी, ते राजीनामा देतील अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे. भाजपला माहित होत की आपल्याकडे बहुमत नाही तरीही राष्ट्रीय नेतृत्वाने बहुमत जमविण्यासाठी आदेश दिला. संसदीय लोकशाही पद्धतीवर भाजपने हल्ला केलाअसं देखील ते म्हणाले.

बहुमतासाठीचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याने पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि येडीयुरप्पा यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे.

You might also like
Comments
Loading...