कर्नाटक सरकार अल्पमतात भाजपचा दावा , कर्नाटक विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकामध्ये राजकीय संघर्ष सुरूच आहे. कर्नाटकातील काँग्रेस-निजद आघाडी सरकारवरील संकट कमी झालेले नाही. आता सरकार अल्पमतात असल्याचा दावा भाजप आमदारांनी कर्नाटक विधानसभेत केला आहे. यावरून आज, (दि.६) विधानसभेत गदारोळ झाला.

कुमारस्वामी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरू झाले. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडे अर्थ खाते असून ते ८ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

विधानसभेत आज राज्यपाल वजूभाई वाला यांचे अभिभाषण सुरू असताना विरोधकांनी जोरदार निदर्शने केली. सत्ताधारी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही. हे अल्पमताचे सरकार असल्याचा दावा करत विरोधी भाजप आमदारांनी जोरदार निदर्शने केली. यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणावेळी व्यत्यय निर्माण झाला.

”तुम्ही भाषण देऊ नका, तुम्ही खोटे भाषण देत आहात. ते वाचू नका, अशा घोषणा भाजप आमदारांनी राज्यपालांचे भाषण सुरू असताना दिल्या. तरीही राज्यपालांनी आपले भाषण सुरूच ठेवले.