भाजपाला मिळालेल्या यशानंतर शेअर बाजारात मोठी उसळी

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर शेअर बाजारात मोठी उसळी घेतल्याचे चित्र पाहायला मिळालं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीचा काही काळ काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर भाजपाने जोरदार मुसंडी मारत काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या दोन्ही पक्षांना बरेच पाठी टाकले. हे कल हाती आल्यानंतर सेन्सेक्स तब्बल 200 अंकांनी वधारला. तर निफ्टी 10850 च्या पातळीवर जाऊन पोहोचला.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी ७२ टक्के मतदान झाले होते. आता आज निकालावरून भाजप करण्तक मध्ये सत्ता स्थापन करणार असल्याच स्पष्ट झाले आहे. परिणामी त्रिशंकू निकालांमुळे अस्थिरता निर्माण होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर यशानंतर शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली आहे.