fbpx

मतमोजणीत तांत्रिक घोळ ; भाजपची काल रात्री एक जागा कमी झाली, आज वाढली !

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक निवडणुकीत कमालीचे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता हुबळी धारवाड मतदारसंघात मतमोजणीत तांत्रिक घोळ झाल्याने, या जागेचा निकाल रद्द करण्यात आला होता. मात्र पुन्हा त्याबाबतची खातरजमा केल्यानंतर, भाजपने जिंकलेली ही जागा त्यांच्याच पारड्यात पडली. जगदीश शेट्टर हे हुबळी धारवाडमधून भाजपचे विजयी उमेदवार आहेत.

हुबळी धारवाड मतदारसंघात इलेक्ट्रिक वोटिंग मशिन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट स्लिप यांच्यातील मतांची संख्या वेगळी येत होती, त्यामुळे येथील निकाल रद्द करण्यात आला होता. जगदीश शेट्टर हे भाजपचे उमेदवार इथून विजयी झाले होते. त्यामुळे परिणामी भाजपच्या 104 जागांमधून एक जागा कमी होऊन विजयी उमेदवारांची संख्या 103 वर आली होती. मात्र अखेर घोळ निस्तरला आणि ती जागा पुन्हा भाजपच्या खात्यात जमा झाली.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल

भाजप 104

काँग्रेस 78

जनता दल (सेक्युलर) 38

बहुजन समाज पार्टी 1

कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1

अपक्ष 1

एकूण 222