fbpx

१७ मे रोजी मीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार – येडीयुरप्पा

bs yediyirappa

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 224 जागांपैकी 222 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. , भाजपा आणि जनता दल सेक्यूलर अशी तिरंगी लढत कर्नाटक मध्ये होत आहे. भाजप आणि कॉंग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.

यातच “सिद्धरामय्या सरकारमुळे जनता त्रस्त झाली आहे. मात्र, यावेळी जनता आमच्यावर विश्वास दाखवणार आहेत. 150 हून अधिक जागांवर आम्ही विजय प्राप्त करू आणि 17 मे रोजी मी शपथ घेणार” , असा विश्वास भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी.एस.येडीयुरप्पा यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, येडीयुरप्पा यांनी मतदान करण्यापूर्वी यांनी घरामध्ये देवाची पूजा केली. त्यानंतर घराजवळील एका मंदिराचे दर्शन घेतले.