भाजपकडून मतदान यंत्रात फेरफार – जी.परमेश्वर

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री पदाची तर काँग्रेसचे जी.परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान उपमुख्यमंत्री पदी विराजमान होताच त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने भाजपने मतदान यंत्रात फेरफार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जी.परमेश्वर म्हणाले की भाजपने मतदा यंत्रात फेरफार केल्यामुळे हक्काच्या मतदारसंघात काँग्रेस पराभूत झाली. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून, मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिका वापराव्यात अशी मागणी देखील करणार असल्याचं त्यांनी सांगितले.

पदभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच परिषदेत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. अर्थात निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व २२४ मतदारसंघांत व्हीव्हीपॅट म्हणजेच मतदान चिठ्ठीचा प्रयोग केला होता. त्यामुळे मतदाराला नेमके मत कोणाला दिले याची खातरजमा करणे शक्य होते. राजेश्वरीनगर मतदारसंघात धर्मनिरपेक्ष जनता दल काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर जयनगरमध्येही भाजप उमेदवाराच्या निधनाने निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी २८ मे रोजी मतदान होणार आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...