Karnataka Election; निकालापूर्वी कॉंग्रेसचे नेते कर्नाटकात दाखल

अशोक गहलोत, गुलाम नबी आझाद जुळवणार कॉंग्रेससाठी सत्तेचे समीकरण

बंगळूरू – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी १२ मेला मतदान झालं होतं. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला २०१९ साली होणाऱ्या लोकसभेच्या दृष्टीकोनातून महत्व प्राप्त झाल्याने. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

दरम्यान विविध मतदानोत्तर चाचण्यांच्या कौलनुसार कर्नाटकात त्रिशंकू स्थिती राहण्याचे भाकित करण्यात आले आहे. तसेच यामध्ये जनता दल (धर्मनिरपेक्ष) अर्थात जेडीएस किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास बाकी असताना काँग्रेस- आणि भाजपचे वरिष्ठ नेते कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत.

काँग्रेसने सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी आपल्या दोन वरिष्ठ नेते अशोक गहलोत आणि गुलाम नबी आझाद यांना कर्नाटकात पाठवले आहे. दरम्यान आपणच कर्नाटकमध्ये बाजी मारणार असल्याचं भाजपने म्हंटल आहे. तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी मात्र भाजपचा दावा खोटा असून, कर्नाटकमध्ये काँग्रेसची पुन्हा सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.