Karnataka Election; थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

बंगळूरू – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी १२ मेला मतदान झालं होतं. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला २०१९ साली होणाऱ्या लोकसभेच्या दृष्टीकोनातून महत्व प्राप्त झाल्याने. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षांचे दिग्ग्ज नेते कर्नाटकमध्ये तळ ठोकून होते. भाजपकडून नरेंद्र मोदी , अमित शहा तर काँग्रेसकडून राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी राज्यात अनेक प्रचारसभा घेतल्या होत्या.

दरम्यान कर्नाटकमधील २२४ पैकी २२२ ठिकाणी मतदान झाले होते. आर.आर. नगर येथील निवडणूक गैरप्रकारामुळे पुढे ढकलण्यात आली तर जयनगर मतदारसंघात भाजप उमेदवाराचे निधन झाल्यामुळे या ठिकाणची निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आली होती.या निवडणुकीसाठी राज्यातील ४० मतदान केंद्रांवर आज मतमोजणी होणार आहे.पहिल्या तास भरातच कौल स्पष्ट होणार असून, कोण बाजी मारणार याकडे देशाचं लक्ष लागलंय.

Loading...

बहुसंख्य मतदानोत्तर चाचण्यांनी सत्ताधारी काँग्रेस व भाजपमध्ये चुरस राहील, असा अंदाज वर्तवला आहे. काँग्रेसने जर बहुमत मिळवले तर १९८५ नंतर प्रथमच एखाद्या पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात यश मिळवता येणार आहे. या आधी १९८५ मध्ये रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वात जनता दलाने सलग दुसऱ्यांदा सत्ता राखली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार