कर्नाटक विधानसभेचं कामकाज सुरू; आमदारांनी घेतली शपथ

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आज बी. एस. येडियुरप्पा विश्वास दर्शक ठरावाला समोर जाणार आहेत. त्यांच्यापुढे बहुमत सिद्ध करण्याचं मोठ आव्हान असणार आहे.

भाजपकडे १०४ जागा असून , भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी ८ जागांची आवशकता आहे. भाजप नेमक बहुमत कसं सिद्ध करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं असून, थोड्याच वेळात विश्वासदर्शक ठरावाला सुरुवात होणार आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभेचं कामकाज सुरू झालं असून ,आमदारांनी शपथ घेण्यास सुरवात केली आहे.Loading…
Loading...