बोपय्या हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहणार; सुप्रीम कोर्टाचा काँग्रेसला दणका

नवी दिल्ली : विराजपेठ येथील भाजपा आमदार के.जी.बोपय्या यांची कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज होणाऱ्या महत्वपूर्ण विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी बोपय्या विधानसभेचे अध्यक्ष असतील. कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी शुक्रवारी दुपारी बोपय्या यांना विधानसभा अध्यक्षपदाची शपथ दिली. आज दुपारी चार वाजता विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे.

मात्र तत्पूर्वी के.जी.बोपय्या यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत कॉंग्रेसने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे दार थोटावले आहे. कॉंग्रेस आणि जेडीएसने बोपय्या यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला आहे. याविरोधात कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टात दाद मागितली. विधासभा अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द वादग्रस्त असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात येऊ नये असं कॉंग्रेसने म्हंटले आहे.

मात्र सुप्रीम कोर्टाने कर्नाटक विधानसभेचे हंगामी अध्यक्ष के. जी. बोपय्या यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या काँग्रेसला आज दणका दिला. बहुमत चाचणीदरम्यान हंगामी अध्यक्षपदी बोपय्याच असतील असे स्पष्ट करतानाच या बहुमत चाचणीचे वृत्तवाहिन्यांवरुन थेट प्रक्षेपण करावे, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

1 Comment

Click here to post a comment